उमेद महिलाच्या आर्थिक विकासाचे प्रभावी पाउल
वर्धा जिल्ह्यात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची प्रभावी अमलबजावणी करण्यात येत आहे. हजारो महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वतःच्या उद्योग व व्यवसायाला सुरवात केली आहे. उमेद अभियानचा मुख्य उदेश हा ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दुष्ट्या दुबळ महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे हा आहे. या अभियानातून महिलांना संघटीत करून विविध उपजीविकेचे साधन राज्य व जिल्हा स्तरावरून करून देण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात सर्कस ग्राउंड रामनगर वर्धा येथे दि. १३ फेब्रुवारी २०२५ ते १७ फेबुवारी २०२५ या दरम्यान मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे. या सरस दरम्यान महिलांना उत्पादन विक्रीचे दालन उपलब्ध करुण देण्यात आले असून विविध उत्पादनाचे गट व खाद्यपदार्थ ची रेलचेल असणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता श्रीमती वान्मश्री जिल्हाधिकारी वर्धा.श्री, जितीन रहमान, मुख्य कार्यकरी अधिकारी, जि.प. वर्धा,श्री.सुरेश गोहाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा तथा प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि. य.वर्धा, अमोल भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जि.प.वर्धा.ज्ञानदा फाणसे उपमुख्य कार्यकरी अधिकारी जि.प.वर्धा,श्री संजय बमनोटे,कृषी विकास अधिकारी ,जि.प.वर्धा ,प्रतीभा भागवतकर,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.वर्धा ,अभूदय मेघे सोशल फोरम,निरज नखाते जिल्हा अभियान व्यवस्थापक,वर्धा स्वाती वानखेडे जिल्हा व्यवस्थापक-सामाजिक समावेशन ,मनीष कावडे जिल्हा व्यवस्थापक-विपणन,प्रतिक मुनेश्वर उपस्थित होते.




श्रीमती वान्मश्री जिल्हाधिकारी वर्धा यांनी आपल्या वक्तव्यात अशाप्रकारचे मिनी सरस चे हे पहिले वर्ष असून गटाचे पॅकेजिंग खूप चांगली आहे, महिला फक्त लोकल न विकता आज अमोझोन सारख्या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उत्पादने जात आहेत याबाबत समाधान व्यक्त केलं, महाराष्ट्राचा असो वा भारताचा ग्रामीण भागाचा विकास आता महिलाच करू शकतात. त्यानंतर महिला सक्षमीकरण व्हायचे असेल तर कुणीही करू शकत नाही. प्रत्येक महिलेची आतून इच्छा पाहिजे, स्वतः महिलांनी सक्षमीकरण करून घेतले पाहिजे, मा. जितीन रहमान मुख्य कार्यकारी अधिकरी जि.प वर्धा यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत काही गोष्टींची मागणी केली आहे, महिलांना उत्पादनाकरीता पॅकेजिंग मशीन व मोबाईल व्हॅन याबाबत आपण मा. पालकमंत्री महोदय यांचेसोबत चर्चा करून महिलाच्या उत्पादन विक्री व पॅकेजिंग करिता मदत करणार असून त्यांनी आश्वासित केले आहे. महिलांची क्रेडिबीलिटी खूप चांगली आहे त्यामुळे त्यांना वैयक्तिक कर्ज द्या याबाबत बँकेना स्पष्ट सूचना दिल्या व कर्ज मिळण्यासाठी जे कागदपत्रे आहेत त्यांची परिपूर्तता करून देण्यात यावी याबाबत महिलांना मार्गदर्शन केले, तसेच पुढील पाच दिवस प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद द्यावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
मा. जितीन रहमान यांनी वर्धा जिह्यात गटाची एक मोठी चळवळ चालू असून विविध उपजीविकेचे साधन महिलांना उपलभ करून देण्यात येत आहे. व त्यान करिता उमेदद्वारे विविध प्रयत्न चालू आहे.महिला सक्षमीकरणाला तांत्रिक प्रशिक्षण वगैरे करीता प्रशासनाची नेहमीच साथ राहील जिल्ह्यातील बचत गटाचे उत्पादने योग्य पद्धतीने मार्केट मध्ये विक्री करिता उपलब्ध करून देण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाची उमेद जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष द्वारे नियोजन करण्यात आले आहे. या मध्ये एकूण १०५ गटांनी सहभाग नोंदविला असून विविध उत्पादने विक्री करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक .सुरेश गोहाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा तथा प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि. य.वर्धा यांनी केले तर सूत्र संचालन कल्याणी वानखेडे प्रभाग समन्वयक, तर आभार प्रदर्शन निरज नखाते यांनी केले. या कार्यक्रमाकरिता बहुसंखेने महिला व उमेद कर्मचारी उपस्थित होते.