तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष ,वर्धा जय दुर्गा स्वयं साहायता महिला बचत गट , वायगाव (नि) या समूहाची स्थापना २२/१०/२०१० ला झाली. समूहात १२ सदस्य हे कुंभार समाजाचे आहेत. मासिक बचत 100 जमा करतात. गटाला २०१२ मध्ये १५०००/- रु फिरता निधी जिल्हा ग्रामीण विकास यत्रने कडून प्राप्त झाला. महिलांची प्रबळ इच्छा शक्ती पिडीजात पारंपारीत व्यवसाय वाढवण्याची होती. सै.लीला बाबुराव वेटूलकर ( अध्यक्ष) सै. छाया अशोक वझे (सचिव) तसेच सै. वनिता गणेश ठाकूर या पदाधिकारी यांनी MSRLM वर्धा येथे आपली इच्छा प्रगत केली. MSRLM वर्धा तर्फे समूहाला एमगिरी वर्धा येथे टेरा-कोटा दागिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उत्पादित मालाचे Ppackaging व Branding कसे करावे या विषयी सुधा मार्गदर्शन करण्यात आले. व्यवसाया करिता भाग भांडवलाची गरज होती ते सुदधा स्टेट बँक ऑफ इंडिया वायगाव (नि) या शाखे मार्फत गटाला दोन एकूण ३६०००/- रु रुपये कर्ज प्रकरणाद्वारे तसेच जादा कर्ज रक्कम संस्कुती ग्राम सेवा संघ वायगाव (नि) समुदाय गुंतवणूक निधी (१२०००/- रुपये) समूहाला मंजूर करण्यात आले .सर्व महिला एकत्रित येऊन टेरा-कोटा दागिने बनविण्याच्या व्यवसायाला सुरवात केली.
समुहाचे उत्पादित मालाला बाजरपेठ व प्रचार व्हावा म्हुनण समूहाचे “वर्धिनी” या नावाने Branding करण्यात आले .त्यामुळे देशभरात प्रदर्शानीच्या मध्यमातून मुंबई येथे ४ वेळा , बंगलोर येथे २ वेळा, दिल्ली येथे ५ वेळा, नागपूर येथे ३ वेळा , चंद्रपूर येथे ४ वेळा तसेच सेवाग्राम व वर्धा येथे ६ वेळा स्टोल लावून या महिलांनी ५०००००/- रुपये नफा मिळविला. बँक कर्ज न समुदाय गुतवणूक निधीच्या कर्ज हफ्त्याची सुधा परतफेड नियमित करण्यात आली. विविध सरस मध्ये जाऊन उत्पादनाची विक्री करण्यात येत आहे . तसेच २०२३-२४ मध्ये महलक्ष्मि सरस मध्ये ७० हजार रुपयाचे दागिने विक्री करण्यात आले आहे. या महिलांची शासनाच्या विविध स्तरावर दाखल घेत विविध सन्मनाने गैरविण्यात आले.
धन्यवाद