महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
आदर्श सावित्रीबाई फुले महिला प्रभाग महासंघ नाचणगाव
सावित्रीबाई फुले यशोगाथा
- प्रभाग संघाचे नाव :- आदर्श सावित्रीबाई फुले महिला प्रभाग महासंघ नाचणगाव
- प्रभाग संघाची स्थापना :- 30/11/2015
- एकूण गाव :- नाचणगाव , खातखेडा, आपटी ,एकांबा ,वाघोली
- समाविष्ट गट :- 284
- समाविष्ट ग्रामसंघ :- 18
- एकूण बचत :- 151400
- एकूण RF निधी :- 41,10,000/-
- एकूण CIF निधी वाटप :- 4,47,50,000/-
- बँक लोन निधी वाटप :- 14,28,52,000/-
- व्यवसाय निधी :- 19,00,000/-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत वर्धा जिल्हा मधील नाचानगाव येथे आदर्श सावित्रीबाई फुले महिला प्रभाग महासंघाची स्थापना 30/11/2015 रोजी करण्यात अली वर्धा जिल्हा गांधीजीचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे व गांधीजीचे स्वप्न होते की लोकांनी गावात राहूनच आपली प्रगती करावी याकरिता त्यांनी छोटे व मोठे लघु गुह उद्योगाची संकल्पना मांडली उमेद अंतर्गत या प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली व लवकरच या प्रभाग संघाला आदर्श स्वरूप प्राप्त झाले या प्रभाग संघामध्ये 18 ग्रामसंघ असून 284 स्वय सहायता समूह आहेत आणि या सर्व प्रभाग संघाचे कार्य साभाळण्यासाठी 69 कॅडर कार्यरत आहे. नाचणगाव या गावाची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे या गावाची एकूण लोकसंख्या 18464 आहे व कुटुंब संख्या 4464 असून प्रभाग संघामध्ये 3264 कुटुब समाविष्ट आहे.
आदर्श सावित्रीबाई फुले प्रभाग संघामध्ये व्यक्तिगत 860 व्यवसाय आहे व सामुहिक व्यवसाय 8 आहे. तसेच आमच्या प्रभाग संघामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाकरिता निधी उपलब्ध झालेला आहे. प्रभाग संघाचा व्यवसाय बाजरी कुकीज करिता 10 लाख रुपये निधी व आधार उद्योगिनी संघाकरिता 5 लाख रुपये व इतर सामुहिक व्यवसायाकरिता 4 लाख रुपये निधी आलेला आहे तसेच प्रभाग संघामध्ये 15 PG उत्पादन करणारा सदस्यांना 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे . तसेच व्यक्तीक व्यवसाय करणारा सदस्यांना OSF अंतर्गत 13 सदस्यांना 15 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. व प्रभाग संघाअंतर्गत CMEGP ,PMEGP याअंतर्गत शिवणकाम करणारा महिलांना व्यवसायाकरिता लोन मिळवून दिलेले आहे प्रभाग संघामध्ये कुर्षी , पशुपालन , कुकुटपालन याअंतर्गत महिला काम करतात परंतु नाचणगाव शहरी विभागाला लागून असल्यामुळे शेतीकडे कमी व व्यक्तिगत व्यवसायाकडे जास्त वळलेले आहे म्हणुन या महिलाच व्यवसायाला व उत्पादित करणारा मालाला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे व जास्तीत जास्त त्यांचा उद्योगाचा प्रचार होण्याकरिता प्रभाग संघ अंतर्गत दिवाळी महोत्सव , उन्हाळी महोत्सव , भरड धान्य महोत्सव आनंद मेळावा या सारखे कार्यक्रम प्रदर्शनी या सारखे कार्यक्रम गर्दीचा ठिकाणी राबवीत असतो तसेच आमच्या प्रभाग संघाला व उद्योगाला भेटी देण्याकरिता इतर जिल्हातील प्रभाग संघ व उद्योग करणारे गट व महिला प्रभाग संघाचे व्यवसाय पाहण्याकरिता येत असतात आतापर्यत या प्रभागाला या वर्षी 8 व्हिजीट झालेल्या आहे तसेच या प्रभाग संघामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबविल्या जात आहेत. तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.