लक्ष्मी अमोल शेंडे या वर्धा जिहयातील मु.पो. सिंधी मे ता. वर्धा,जि.वर्धा येथील रह्वासी असून उमेद अभियानाला 3/3/2015 रोजी जुळून उद्योगिनी गटात सदस्य झाल्यात. गटात यायच्या दोन वर्ष पहिले त्याच्या पतीची नोकरी गेली होती त्यामुळे घरची परिस्थिति चांगली नव्हती. जेव्हा उमेद अभियानात जुळले तेव्हा मला आपण काहीतरी करू शकते अशी आशेची किरण दिसायला लागली .गटाच्या सभेत मला उद्योगनिर्मिती विषयी माहिती मिळाली व मी काय कारव यावर विचार करू लागली त्यात असे लक्षात आले की मी पापड हे वर्ष भर चालणारे उत्पादन आहे. आपण घरगुती स्तरावर पापड बनवतो तेच आता विक्री करिता ठेवावे. या करिता गटातून 5000 रु कर्ज घेतलं व पापड बनवायला सुरवात केली . पहिल्यांदा तादुळ पापड व उडीद मुंग पापड बनवले.
या उद्योगात माझे पती अमोल शेंडे याची विक्री करता मदत केली व सर्व पापड ची विक्री झाली . विविध स्टाल,विक्री प्रदर्शने तसेच वर्धा येथील वर्धिनी विक्री केंद्र येथे उत्पादने नियमित विकत गेलीत.
वर्धेमध्ये वार्षिक विक्री प्रदर्शनी ‘वर्धिणी महोत्सव’ मध्ये स्टॉल लावला व माझा सर्व पापड विक्री झाली. यामधुन मला 15000 हजाराचा लाभ झाला. यामुळे त्यांचा व त्याच्या पतीचा उत्साह वाढला व आता त्यांनी मशीन घेण्याचे ठरवले .त्याकरिता गटामधून 2,00,000/- कर्ज घेऊ पापड मशीन घेतली.
आज त्याच्याकडे 10 महिला काम करीत असून 2 महिलाना घरोघरी विक्री करिता पाठवीत असून 50000 ते 60000 रु विक्री त्यांच्याद्वारे चागली विक्री होत आहे. तसेच शासनाच्या ‘सरस’मध्ये दिल्ली,गोवा तसेच महाराष्ट्रमध्ये ‘महाल्क्ष्मी सरस’ येथे मालविक्री करिता सहभागी झालेल्या आहे. आता त्यांचे पापड वर्धा ,नागपुर,बुलढाणा येथे विक्री करिता देत आहे .Amazon वर देखी पापड उपलब्ध आहे. तसेच DMART सोबत बोलणे सुरू आहे . आता त्यांची आर्थिक परिस्थिति सुधारली असून दोन मूल कॉन्व्हेंटला शिक्षण घेत आहे . माझ्या पूर्ण घरखर्च याच उद्योगातून होतो .
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनत्ती अभियानामुळे त्यांना 12 जून 2018 रोजी देशाचे मा.प्रंतप्रधान श्री.नरेद्रजी मोदी यांच्याशी पापड उद्योगा विषयी बोलण्याची VC द्वारे संधी मिळाली. आणि हा क्षण अकल्पनीय होता. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 14 लाख आहे. त्यातून त्यांना वार्षिक 6-7 लाख उत्पन्न मिळत आहे. उमेद अभियानामुळे मी जीवनात स्वावलबी व आर्थिक सक्षम झाली आहे …
लक्ष्मी अमोल शेंडे
उद्योगिनी महिला स्वयम सहायता गट,
प्रभाग- सिंदी मेघे ,ता. वर्धा,जि.वर्धा
फोन न:-९३२६०२१३६२