वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील रह्वासी असून तालुक्या पासून २० किमी अंतरावर गिरड हे गाव आहे. तेथील सारिका अजय खोब्रागडे यांना दोन मुली असून त्यांचे पती कडधान्य खरेदी विक्री चा व्यवसाय करतात. त्या स्वयं सहायता समूहात येण्या अगोदर खाजगी ,सावकारी कर्ज घेत होत्या. व पतीच्या व्यवसायात मदत करून त्या १५० रुपये रोजीने दिवसभर लोकाच्या शेतात रोज मजुरीने काम करायला जात असत. बँकांचे जास्त व्याज व आठवडी पंधरवाडी पैसे परतफेड करायचे. त्यासाठी त्यांचे व पतीचे पैसे त्याच्यातच जायचे, पुन्हा व्यवसाय उभारण्यासाठी नवीन बँकांचे कर्ज काढावे लागत होते. असेच त्यांचे आयुष्य चालले होते.
मात्र एक दिवस गावतल्या ICRP/ प्रेरिका भारती मोटघरे यांनी उमेद अभियानाची सर्व माहिती सांगितली व दहा ते बरा महिलांचा एक समूह तयार करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी दहा महिलाचा एक आकृती स्वयं सहायता महिला समुह तयार केला. नंतर सखी ग्रामसंघाला सदर समुह सभासद म्हणून जोडला. या समूहातून त्यांच्या व इतर सदस्यांच्या गरजा भागू लागल्यात. जसे कि बँक कर्ज, ग्रामसंघ कर्ज, समूहातून अंतर्गत कर्ज घेऊन आपल्या विविध गरजा भागवू लागलोत. त्यानंतर त्यांनी बाहेरून ,सावकाराकडून , MICRO FINANACE कंपनी कडून जास्त व्याजाने कर्ज घेणे बंद केले. त्यानंतर गटाचे रेकॉर्ड,गटाची कामे,ग्रामसंघाचे रेकॉर्ड,ग्रामसंघाचे काम कसे असतात हे शिकून घेतले. त्यानंतर त्यांना वरिष्ठ वर्धिनी कामाची माहिती तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे सरानी दिली. त्यांनी कामाचे स्वरूप, काम कोठे करायचे ही सर्व माहिती देवून काम करण्यास मदत केली व वेळोवेळी मार्गदर्शन केले. नंतर मी समुह बांधणी, ग्रामसंघ बांधणी साठी प्रशिक्षक म्हणून बाहेर जिल्हात काम करित आहे. उमेद अभियानात काम करतांना स्वतःला ओळखण्याची संधी प्राप्त झाली तसा आत्मविश्वास वाढला उमेदमध्ये काम करतांना खुप काही शिकायला मिळाले.
सतत कार्यरत असल्यामुळे उमेद अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. ‘लोणचे ,मसाले, पापड, वाशिंग पावडर, भांडे धुवायचे लीक्विड बनवायचे प्रशिक्षण घेतले. व आता त्या स्वतः लोणचे ,मसाले, पापड, वाशिंग पावडर, भांडे धुवायचे लीक्विड तयार करत आहे. व विक्री करत आहे. गाव पातळीवर समुद्रपूर तालुक्याच्या तालुका अभियान व्यवस्थापक निशा मेश्राम मॅडम यांनी त्यांना नेहमी मार्गदर्शन केले. त्या त्यांच्या सारखा महिलांना कायम स्वरूपी मदत करित असतात. अभियानाने आम्हाला वर्धिनी मॉल, ग्राम संघ, प्रभागसंघ, दिवाळी फराळ मोहत्सव, महालक्ष्मी सरस सारखे मार्केट उपलब्ध करून दिले. व्यवसायाला नवीन चालना मिळाली. तसेच पती अजय हरिषजी खोब्रागडे हे त्यांच्या पाठीशी उभे राहुन क्षणो क्षणी मदत केली. जिल्हामध्ये, जिल्ह्य बाहेर जाऊन काम करण्यास प्रोत्साहन दिले. व 10 वी 12 वी चे शिक्षण पूर्ण करण्यास , पेपर देण्यास मदत केली व आता BSW चे शिक्षण पुर्ण करण्यास मदत करित आहेत. त्यांना त्यांच्या मुली सुध्दा मदत करीत असून उमेद अभियानाकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती सुधारली. आता इथेच सांगण्यासारखे खुप काही आहे. “वाईट गुण सोडुन चांगल्या सवई लावुन स्वताच्या पायावर आपल्या लेकीला उभे करणारी आई म्हणजे उमेद होय.” मला माझ्या जीवनात उमेद अभियानाच्या निमित्ताने चांगले गुरु लाभले. उमेद अभियानातील CRP भारती ताई मोटघरे,तालुका व्यवस्थापक आरसे सर,तालुका अभियान व्यवस्थापक निशा मेश्राम मॅडम तसेच माझे पतीं व मुली नसते तर मी ईथपर्यंत पोहचले नसते. उमेद अभियानाला शत-शत नमन, धन्यवाद उमेद अभियान.!
आपली नम्र
सारिका अजय खोब्रागडे
वरिष्ठ वर्धिनी
रा.गिरड ता.समुद्रपूर